नोंदणी

शाळा नोंदणी प्रक्रिया
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० पर्यावरण सेवा योजनेमध्ये महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासन मान्य शाळा स्वेच्छेने ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवू शकता. 

महत्वाची सूचना-
ज्या शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पर्यावरण सेवा योजना माझी वसुंधरा अभियान ४.० दरम्यान शाळांसाठी नाव नोंदणी हा फॉर्म भरला असेल त्यांनी माझी वसुंधरा अभियान ५.० शाळा नाव नोंदणी करण्यासाठी पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, जर मागील वर्षी नाव नोंदणी फॉर्म भरला नसेल त्याच शाळांनी शैक्षणिक वर्ष- २०२४-२५ साठी फॉर्म भरावा. 

शाळा नोंदणीसाठी आवेदन अर्ज/लिंक 

फॉर्म भरण्यासाठी खालील योग्य त्या लिंक वर क्लिक करावे. याने आपणास एक गूगल फॉर्म ओपन होईल त्यावरील संपूर्ण सूचना वाचून सदर फॉर्म माहिती भरून सबमीट करावा.  

शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये माध्यमिक शाळांसाठी वेगळा फॉर्म व त्याची वेगळी लिंक तसेच प्राथमिक शाळांसाठी वेगळा फॉर्म तसेच वेगळी लिंक खाली देण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा

प्राथमिक शाळा

योजना प्रमुख शिक्षक परिचय नोंदणी फॉर्म

योजना प्रमुख शिक्षक/ शिक्षिका निवड/नियुक्ती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल, सदर नियुक्ती शाळेतील मा.प्राचार्य/मा.मुख्याध्यापक यांच्या स्तरावर निर्णय घेतल्यावरच सदर शिक्षकाने ऑनलाइन फॉर्म भरावा. 
योजना प्रमुख परिचय फॉर्म भरल्या नंतर योजना प्रमुख नियुक्ती प्रक्रिया ग्राह्य धरण्यात येईल.

योजना प्रमुख परिचय फॉर्म

शाळा स्तरावर-५० विद्यार्थ्यांचा गट स्थापना 

५० विद्यार्थ्यांचे ESS शाळा युनिट- विद्यार्थी/विद्यार्थिनी सम समान प्रमाण निवड करणे व एक विद्यार्थी व एक विद्यार्थ्यांनी गट प्रमुख निवड करावी

क्रम- अ.क्र./ विद्यार्थ्याचे नाव/इयत्ता/तुकडी

(पर्यावरण सेवा योजनेमध्ये ५० विद्यार्थ्यांचा गट आपण शाळा स्तरावर स्थापन केला आहे (समसमान विद्यार्थी २५ / २५ विद्यार्थिनी) गटातील विद्यार्थ्यांमधून २ विद्यार्थी (१ विद्यार्थी / १ विद्यार्थिनी) गटप्रमुख आपण निवड केलेले आहे सदर विद्यार्थ्याची नावाची यादी एक्सलं किंवा कच्या स्वरुपात नोंदी करून ठेवावी