पर्यावरण सेवा योजना

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन, पर्यावरण सेवा योजना (ESS) संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. यांमध्ये महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शासन मान्य शाळा स्वेच्छेने ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवू शकता.

योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, यशस्विता, लक्षप्राप्ती लक्षात घेता माननीय (वित्त) मंत्री महोदय यांनी सन २०२३ रोजीच्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये पर्यावरण सेवा योजना राज्यभरातील ७५०० शाळांमध्ये राबविण्याची घोषणा केली होती. ही योजना पूर्ण राज्यभरात लागू असून योजनेचा दुसरा टप्पा म्हणून आगामी पाच वर्षात राज्यभरातील ७५०० शाळांमध्ये योजना राबविण्यात येईल.

नोंदणी

भागीदार

पर्यावरण सेवा योजना (ESS)
या उपक्रमाचे उद्दिष्ट शहरी व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागतिक तापमान वाढ, हवामान बदल यांचे परिणाम कमी करण्याच्या उपाययोजना व कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे हा आहे. शालेय स्तरावर केवळ एक विषय म्हणून पर्यावरणावर लक्ष केंद्रित न करता पाठ्यपुस्तकातील इतर घटकाशी सहसंबंध जोडून कृतियुक्त ज्ञानरचनावादी पद्धतीने पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात येत आहे. अधिक माहिती 

शालेय  उपक्रम

शाळा नोंदणी

शाळेची नोंदणी कशी करावी?
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० पर्यावरण सेवा योजनेमध्ये महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासन मान्य शाळा स्वेच्छेने ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवू शकता